भुसावळ प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टीच्या कायदे आघाडीच्या शहराध्यक्षपदी ॲड. अभिजित मेने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी आमदार संजय सावकारे, शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजन डॉ. नि.तू पाटील, कायदे आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील, भाजपाचे शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अनिरुद्ध कुळकर्णी यांची उपस्थिती होती. पक्षातर्फे देण्यात आलेल्या या महत्वपूर्ण जबाबदारीच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटका साठी काम करणार असल्याचा तसेच पक्ष संघटन अधिक मजबूत करून जनसेवा करणार असल्याचा मानस नुतन अध्यक्ष ॲड. अभिजित मेने यांनी व्यक्त केला.