Home क्राईम विषारी औषध घेतल्याने प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू !

विषारी औषध घेतल्याने प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू !


धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील निंभोरा गावात राहणाऱ्या एका ४७ वर्षीय प्रौढ व्यक्तीने विषारी औषध घेतले होते, त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या संदर्भात बुधवारी २५ जून रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. भरत बळीराम कोळी (वय-४७, रा.निंभोरा ता.धरणगाव) असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.

पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील निंभोरा गावात भरत कोळी हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला होते. त्यांनी राहत्या घरी काहीतरी विषारी औषध सेवन केले होते. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली, त्यांना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटने संदर्भात बुधवारी २५ जून रोजी दुपारी २ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र भदाणे हे करीत आहे.


Protected Content

Play sound