जळगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील एका प्रौढाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पाळधी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रविंद्र संभाजी चंदनशिव (वय-४५) रा. पाळधी ता. धरणगाव जि.जळगाव असे गळफास घेतलेल्या प्रौढाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र चंदनशिव हे पत्नी मंगलाबाई, मुलगा पवन आणि लहान मुलगी पलक यांच्यासह राहतात. ते बांधकाम करण्याचे काम करतात. काल सोमवारी ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास राहत्या घरात कुणीही नसताना छताला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या केल्याचे नेमके कारण कळू शकले नाही. सायंकाळी पत्नी मंगलाबाई घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.