फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी | दर्जेदार शिक्षण, उच्च निकालाची परंपरा आणि अद्ययावत सुविधांनी युक्त असणार्या येथील जे.टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला आहे.
फैजपूर येथील जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेज १९८४ पासून अभियांत्रिकी व मूल्य शिक्षण यांचा समन्वय साधत सातत्याने प्रगतिपथावर आहे. भुसावळ विभागातील सर्वप्रथम एनबीए मानांकित महाविद्यालय असून नॅक मूल्यांकन सुद्धा आहे. महाविद्यालयास एआयसीटीई नवी दिल्लीची मान्यता असून इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स,कोलकता चे सुद्धा मानांकन आहे.महाराष्ट्र शासन द्वारा महाविद्यालयात अदर्जा प्राप्त आहे. तसेच कॉलेज डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे बाटूशी संलग्नित आहे. कॉलेेजमध्ये बी. टेक. साठी मेकॅनिकल, सिव्हिल, कम्प्युटर,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखा उपलब्ध आहेत. एम टेक साठी मेकॅनिकल (मशीन डिझाईन) व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या दोन शाखा उपलब्ध असून कॉलेज कोड इएन ५१६८ आहे.
कोरोनामुळे बिघडलेली अर्थव्यवस्था व नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या विपरीत परिणामाचा विचार करून जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेजने सामाजिक बांधिलकी म्हणून अत्यल्प फी आकारून इंजीनियरिंग शिक्षण उपलब्ध करून दिलेले आहे. याच्या अंतर्गत एससी/एसटी/एनटी/एसबीसी आदी प्रवर्गांना मोफत शिक्षण तर ओबीसी संवर्गासाठी कंप्यूटर व सिव्हिल या ब्रँचसाठी २०००० रुपये; मेकॅनिकल साठी १०००० रुपये तर ई अँड टी सी साठी ५००० रुपये फी ठरविण्यात आलेली आहे.
जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक उच्चशिक्षित व अनुभवी आहेत. कॉलेजमध्ये पीएच.डी. प्राप्त प्राध्यापक दहा असून सर्व प्राध्यापक एम. टेक. आहेत. पुणे विद्यापीठ मान्यता प्राप्त प्राध्यापक असून अनेक प्राध्यापकांनी पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य,उमवि जळगाव सिनेट, डीन,अध्यक्ष,विविध अभ्यास मंडळ इत्यादी पदे भूषविलेली आहेत.
जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नियमित तासिका होतात व प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते त्यामुळे उ म वि जळगाव व बाटू लोणेरे या विद्यापीठांमध्ये कॉलेजचा रिझल्ट अतिशय दर्जेदार आहे. आतापर्यंत ८० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. तसेच सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थ्यांची उज्ज्वल परंपरा कॉलेजने जोपासलेली आहे. कोरोनाची परिस्थिती असून सुद्धा एम टेक चे दोन विद्यार्थी विद्यापीठातून प्रथम येऊन सुवर्णपदक पटकावले आहे.
अतिशय उल्लेखनीय बाब म्हणजे उपलब्ध असलेल्या शाखांमधून सर्वच्या सर्व तीन मेरीट पोझिशन सिव्हिल, मेकॅनिकल,ई अँड टी सी शाखांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणारे एकमेव इंजिनिअरिंग कॉलेज आहे. जे. टी. महाजन इंजिनिअरिंगचा हा विक्रम आजही अबाधित आहे. कॉलेजमधील ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल अतिशय कार्यक्षम असून प्रत्येक विद्यार्थ्याला या स्पर्धेच्या युगात पाय रोवण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य आत्मसात करण्यासाठी नियमितपणे प्रशिक्षण दिले जाते. कोरोनाच्या काळात सुद्धा विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
कॉलेजच्या सर्व विभागांमधील प्रयोगशाळा सुसज्ज असून संशोधनासाठी युजीसी मान्यताप्राप्त आहेत.कॉलेजचे ग्रंथालय अतिशय समृद्ध असून ७०००० पेक्षा अधिक पुस्तके आहेत तसेच आयआयटी व्हिडीओ लेक्चर्स जर्नल्स, इ-बुक सुविधा उपलब्ध आहेत. कॉलेज परिसरातच विद्यार्थी-विद्यार्थिनींना सर्व सुविधायुक्त वसतीगृहाची सुविधा उपलब्ध आहे. महाविद्यालयात विविध अभ्यास पूरक व अभ्यासेतर कार्यक्रम आयोजित केले जातात वेगवेगळ्या वर्कशॉप, सेमिनार,कॉन्फरन्सेस द्वारा विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घातली जाते. अशाप्रकारे दर्जेदार इंजीनियरिंग शिक्षणासाठी जे टी महाजन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कार्यरत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
प्रा. जे. बी. भोळे ९३२५१८८९८२
डॉ. के. जी. पाटील ९६३७०७१२९१
( संस्थेचे फक्त जे टी महाजन पॉलीटेक्निक तात्पुरते डीऍफिलिएट आहे आणि जे टी महाजन इंजिनियरिंग कॉलेज अतिशीय सुस्थितीत सुरू आहे व प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाद्वारे एफसी सुविधा केंद्र सुदधा देण्यात आलेले आहे. म्हणून पालकांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता प्रत्यक्ष कॉलेजला भेट देऊनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा व पाल्यांच्या भविष्याबद्दल आश्वस्त राहावे असे आश्वासन व आवाहन संस्था चालकांनी केले आहे. )