पारोळा, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरा ४५ कोटी रूपयाच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी देण्यात आली पाणीपुरवठा योजनेचा प्रशासकीय मान्यता आदेश राज्याचे नगरविकासमंत्री ना.एकनाथ शिंदे हस्ते आमदार चिमणराव पाटील यांना सुपुर्द करण्यात आला.
आमदार चिमणराव पाटील यांचा उपस्थितीत व नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा दालनात दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ रोजी तातडीची प्रकल्प समितीची बैठक आयोजित करून योजनेस मंजुरी देण्याचा सुचना दिल्या.
या बैठकीत एकमुखाने पारोळा शहराचा ४५ कोटी रूपयाचा पाणीपुरवठा योजनेस मंजुरी देण्यात आली व आज शुक्रवार, दिनांक ०४ मार्च २०२२ रोजी आमदार चिमणराव पाटील यांना आपल्या शासकीय दालनात बोलावून पारोळा शहरासाठी तब्बल ४५ कोटी रुपयांचा पाणीपुरवठा योजनेचा प्रशासकीय मान्यता आदेश राज्याचे नगरविकासमंत्री ना.एकनाथ शिंदे हस्ते आमदार चिमणराव पाटील यांना सुपुर्द करण्यात आला.
या योजनेचा मंजुरीमुळे पारोळा शहराचा कायमचा पाणीप्रश्न सुटणार असल्याने या निर्णयामुळे शहरातील जनमानसात आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. या मंजुरीच्या अनुषंगाने आमदार चिमणराव पाटील व पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जळगांव जिल्हा बँकेचे संचालक मा.अमोल पाटील यांनी मतदार संघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे व राज्याचे नगरविकासमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्यासह पारोळा नगरपरिषद मुख्याधिकारी ते प्रधान सचिवापर्यंत ज्या-ज्या अधिकारी कर्मचारी यांनी वेळोवेळी सहकार्य केले त्यांचे जाहीर आभार मानले. शहरवासियांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी एक भाग बनलो त्याचा आनंद असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले.