मुंबई (प्रतिनिधी) शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वरळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. यानिमित्ताने ठाकरे कुटुंबातील पहिल्या सदस्याची माहिती समोर आली असून प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार ते कोट्यधीश असल्याचे समोर आले आहे.
या अर्जाबरोबर ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे आपल्या संपत्तीचे विवरण दिले. त्यांनी एकूण संपत्ती ११ कोटी ३८ लाख असल्याचे म्हटले आहे. यापैकी बँकेमध्ये १० कोटी ३६ लाख रुपये आहेत. त्याचबरोबर बॉण्ड शेअर्समध्ये २० लाख ३९ हजारांची गुंतवणूक करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त ४ कोटी ६७ लाखांची स्थावर मालमत्ता आदित्य यांच्या मालकीची आहे. ठाकरे घराण्यातील एका व्यक्तीची संपत्ती प्रथमच आदित्य यांच्या उमेदवारीमुळे जाहीर झाली आहे.