अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची महसूल उपायुक्तपदी बदली

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा प्रशासन विभागातील अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची महसूल उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. ते उद्या १७ डिसेंबर रोजी महसूल उपायुक्त पदाचा पदभार घेणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात गोरक्ष गाडीलकर यांनी गेल्या तीन वर्षांपासून अपर जिल्हाधिकारी म्हणून पदभार यशस्वीपणे संभाळला आहे. त्यानंतर त्यांची जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी पदोन्नती मिळाली होती. दरम्यान कोरोना आपत्तीच्या काळात कोवीड नियंत्रणासाठी त्यांची जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी दिलेल्या जबाबदारीने नोडल अधिकारी म्हणून गोरक्ष गाडीलकर यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात इच्छुकांच्या मदतीने आर्सेनिक अल्बम या प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या औषधीचे संपुर्ण जिल्ह्यात यशस्वीरित्या वितरण केले होते. ही जबाबदरी पार पाडत असतांना त्यांनी कोरोनाशी हात करून मात मिळविली होती. आता अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची महसूल उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. १७ डिसेंबर रोजी ते आपल्या नवीन पदाचा पदभार घेणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

 

Protected Content