रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील राजेंद्र तडवी (सहस्त्रलिंग), हंसराज शिरसाड (खिरवळ), आणि श्रीकांत पाटील (वाघोदा खुर्द) यांना जिल्ह्याचा आदर्श ग्राम सेवक पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार उद्या मंत्रीमहोदय व जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात येणार आहे.
आदिवासी भागात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना पोहोचवण्यासाठी सहस्त्रलिंग येथील ग्रामसेवक राजेंद्र तडवी यांनी खूप मेहनत घेतली. त्यांनी हगणदारी मुक्त गाव, विविध शासकीय योजना,घरकुल योजना आणि आदिवासी बांधवांच्या कुटुंबांसाठी कल्याणकारी योजना गावपातळीवर पोहोचवल्या
दुसरा पुरस्कार खिरवळ येथील ग्रामसेवक हंसराज शिरसाड यांना मिळाला आहे. कोरोना काळात जीवाची परवा न करता खिरवळ गावासाठी काम केल्याबद्दल व शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवल्याबद्दल श्री शिरसाड यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
तिसरा पुरस्कार वाघोदा खुर्द येथील ग्रामसेवक श्रीकांत पाटील यांना मिळाला आहे. कुंभारखेडा येथे मध्ये कार्यरत असतांना विविध योजना प्रभावीपणे राबवल्या व शंभर टक्के निधी खर्च केला.त्यांचा कार्यकाल अपंग,महिला व बाल कल्याण आणि मागासवर्गीयांसाठी महत्वपूर्ण ठरला आहे. रावेर तालुक्यातील इतरही काही ग्राम सेवकांना पुरस्कार जाहीर झाला असुन. उद्या मंत्रीमहोदयांच्या हस्ते तिघांचा गौरव होणार आहे.