पारोळा तालुका डॉक्टर्स असोसिएशनतर्फे आदर्श शिक्षक सदानंद भावसार यांचा सत्कार

पारोळा प्रतिनिधी । पारोळा तालुका डॉक्टर्स असोसिएशन तर्फे धन्वंतरी पूजन सोहळानिमित्त येथील आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद भावसार यांना समारंभाचे अध्यक्ष माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांचे हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व गौरव पत्र प्रदान करुन सत्कार करण्यात आला.

भावसार सरांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि कोरोना काळातील तन-मन-धनाचे सेवाभावी योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. सत्कारार्थी म्हणून व्यक्त केलेल्या मनोगतात सरांनी असोसिएशनला सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सेवाभावी उपक्रम राबविण्याबरोबरच जीवनात सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन केले. तसेच असोसिएशनला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आभार मानले .

 

Protected Content