सरकटे बंधूंच्या स्वरविहार कार्यक्रमाने वाढणार सोहळ्याची रंगत
चाळीसगाव (प्रतिनिधी) सी.एम. चषक अंतर्गत पार पडलेल्या क्रिडा आणि कला स्पर्धांचा पारितोर्षिक वितरण समारंभ सोमवार, दिनांक 4 मार्च 2019 रोजी सायंकाळी 6 वाजता शहिद हेमंत जोशी क्रिडांगण, नेताजी पालकर चौक, चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी स्वर विहार औरंगाबाद कृत मराठमोठा कार्यक्रम महाराष्ट्राची लोकधारा आयोजित करण्यात आलेला आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री रेशम टिपणीस यावेळी उपस्थित राहणार आहेत.
सी. एम. चषक अंतर्गत पार पाडलेल्या क्रिडा व कला स्पर्धांमध्ये एकुण 31 हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. क्रिकेट स्पर्धांमध्ये आझाद क्रिकेट क्लब, छत्रपती 11, नेताजी पालकर, सीएसएन टायगर, इंडियन फायटर्स, ग्रेस अकॅडमी. महिला गटात जिल्हा परिषद शाळा शिंदी, राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज, नानासाहेब य. ना. चव्हाण महाविद्यालय या संघांनी विजेतेपद पटकाविले.
हॉलीबॉल स्पर्धेत अंधशाळा ए टीम, अंधशाळा सी टीम तसेच पासिंग प्रकारात तरवाडे टायगर, राष्ट्रीय विद्यालय, चाळीसगाव यांनी विजय संपादन केला. धावण्याच्या स्पर्धेत सुमारे 7 हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. 100 मीटर आणि 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत ममता चव्हाण, मयुरी शिंपी, निशा चव्हाण, पूजा पाटील, अर्चना जाधव, खुशी घुले, अर्चना पाटील, सोनुबाई मोरे, माधुरी राजपुत, मयुर राजपुत, समाधान मोरे, प्रविण गायकवाड, प्रकाश पावरा, ध्रुव पाटील, जितेंद्र राठोड, हरीश्चंद्र चौधरी, जितेंद्र पावरा, सुनील राठोड, सुरेश देशमुख, प्रथमेश पाटील, रोहन पाटील, राहुल भिल्ल, चेतन चव्हाण, शरद दडे, शुभम चौधरी, समाधान जाधव यांनी विजय संपादन केला. खोखो स्पर्धेत माध्यमिक आश्रमशाळा देवळी, राष्ट्रीय क्रिडा मंडळ चाळीसगाव, माध्यमिक आश्रमशाळा देवळी, जिल्हा परिषद शाळा, ओझर, नानासाो. य. ना. चव्हाण महाविद्यालय, माध्यमिक विद्यालय वाघळी, यांनी विजय संपादन केला. हॅन्डबॉल स्पर्धेत टीम यंगस्टार, ओम साई, रूद्र वॉरियर्स, आनंदीबाई बंकट मुलींची शाळा टीम ए, आनंदीबाई बंकट मुलींची शाळा टीम बी, काकासाो. पूर्णपात्रे विद्यालय, चाळीसगाव यांनी विजय संपादन केला.
कॅरम स्पर्धेत फिरोज शेख, रमजान शेख, चेतन बागड, मयुरी सोनवणे, ऋतुजा पाटील यांनी विजय संपादन केला. कुस्ती स्पर्धेत मिनाक्षी महाले, खुशी घुले, प्रिया पाटील, रूपाली चव्हाण, कृणाली पाटील, मोहिनी पवार, नेहा जाधव, नेहा महाले, सोनाबाई मोरे, राणी भिल्ल, मनिषा पगारे, वैशाली कोळी, चैताली गवळी, जयश्री चव्हाण, ऋतुजा पाटील, दिपाली मोरे, सुवर्णा बागुल, पूजा भालेराव, मयुर शिंदे, राहुल मोरे, राहुल पाटील, दिपक मोरे, मोहसीन खान, राजु गायकवाड, अनिल पवार, दिनेश गायकवाड, गोकुळ साबळे, नासीर शेख, योगेश दळवी, भुषण चौधरी, मच्छिंद्र रावते, गोपाल जाने, राहुल आगोणे, सतिष पाटील, मयुर गणेशपुरे, अंकुश बच्छे, रोहित माळी, राजेश ढगे, समाधान गायकवाड, लहु पवार, मिलींद जगताप, मयुर माळी, अजय पाटील, शक्तीमान राठोड, विशाल राजपुत, गणेश पाटील, पवन रावते, चेतन पाटील, बबलु चव्हाण, मोहन गायकवाड, राकेश पवार, जहिर खान, निलेश पाटील यांनी विजय संपादन केला.
बॅडमिंटन स्पर्धेत अंतर्गत देवदत्त अहिरे, सोहम पाटील, स्वरा पाटील, ओवी पाटील, जयदित्य परमार, रोहन पवार, पालवी तेंडुलकर, मिताली जैन, कौशीक बागड, साहिल चव्हाण, हेमंत सोनवणे, ओम पटेल, मैत्रेयी राणा, सेशल राणा, सोहेल शेख, मयुर भावसार, परेश चौधरी, अमोल पाटील यांनी विजय संपादन केला. कबड्डी स्पर्धेत टिम वसंतराव नाईक चाळीसगाव, ओमसाई ओढरे, शिवधर्म टाकळी, आ. बं. हायस्कुल चाळीसगाव, माध्यमिक विद्यालय बहाळ, नानासाो. य. ना. चव्हाण महाविद्यालय चाळीसगाव यांनी विजय संपादन केला. नृत्य स्पर्धेत ओजस्वी ग्रुप, शाडो ग्रुप, हॅपी बॉईज ग्रुप, राजवीर राजपुत, समृद्धी बच्छाव, निल पाटील, शुभम गजरे, लिना महाले, साक्षी गवळी, समिक्षा तायडे यांनी विजय संपादन केला.
गायन स्पर्धेत सिद्धेश खैरनार, सौरभ बागड, प्रकाश राठोड, रोशली गेडाम गोडघाटा, साक्षी वाघ, श्रावणी कोटस्थाने, कुशाग्र बडगुजर, हर्षवर्धन जोंधळे, प्रणव पवार, स्नेहल सापनर, गायत्री चौधरी, अमृता कसबे यांनी विजय संपादन केला. रांगोळी स्पर्धेत अनिता पिंगळे, राजश्री शेटे, नयना पाटील, मयुरी पाटील, विशाखा राठोड, मनिषाा बोरसे, नेहा बेलदार, सागर राणा, प्राची गुप्ता, सई पाटील, मुक्ता कोळी, कल्याणी वानखेडे, रक्षंदा रणदिवे, प्रियंका पाटील यांनी विजय संपादन केला. चित्रकला स्पर्धेत चैतन्य सातपुते, तेजल नानकर, राजश्री देशमुख, महेंद्र पवार, दामिनी सोनवणे, कल्पेश मोरे, पूजा वाघ, प्रदिप बागुल, यश चव्हाण, मोहनिश मोरे, दिव्या वाघ,लिना सोनवणे, अनिल वसावे, साहिली सोनवणे, रोहित गढरी, अक्षय ठाकरे, ललीत पाटील, पवन वाघ, निशांत वाघ. यावेळी तालुक्यातील क्रिडा व कला क्षेत्रात कार्यरत गुरूजनांचा सत्कार करण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन आमदार उन्मेष भैय्यासाहेब पाटील भारतीय जनता पार्टी, भारतीय युवा मोर्चा यांनी केले आहे.