अभिनेत्री केतकी चितळे हिचा जामीन मंजूर

ठाणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वादच्या भोवऱ्या अडकलेली अभिनेत्री केतकी चितळे हिचा ठाणे सत्र न्यायालयाने २५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वासर्वे शरद पवार यांच्या बद्दल अभिनेत्री केतकी चितळे हिने आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यासंदर्भात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यातील अभिनेत्री केतकी चितळे हिला अटक करण्यात आली होती.  ठाणे सत्र न्यायालयात केतकीच्या वकिलांनी तिला जामीन मिळावा यासाठी युक्तीवाद केला होता. या प्रकरणी युक्तीवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयानं पुढील सुनावणीसाठी १६ जून ही तारीख दिली होती. दरम्यान, न्यायालयानं आज तिला २५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरी आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी पुढील सुनावणी २१ जून रोजी होणार आहे.

 

Protected Content