अभिनेत्री कंगना रनौत यांचा तब्बल ७२ हजार मतांनी विजय

मंडी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने निवडणुकीच्या रिंगणात एन्ट्री घेत हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. भाजपकडून अभिनेत्रीला निवडणुकीचे तिकीट देण्यात आले होते. बॉलिवूडची पंगा क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रनौत हिने आता निवडणुकीच्या रणात आपला जलवा दाखवला आहे.

२०२४च्या लोकसभा निवडणुकीत पदार्पण करणारी अभिनेत्री-राजकारणी कंगना रनौत हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून सत्तेच्या रिंगणात उतरली होती. पहिल्याच निवडणुकीत कंगना रनौत हिचा विजय झाला आहे. काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह यांच्या विरोधात उभ्या असलेल्या कंगना रनौतने ७२,०८८ मतांनी विजय मिळवला आहे. आता सगळीकडूनच अभिनेत्रीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये १ जून २०२४ रोजी निवडणूक पार पडली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळली आहे. या दोन्ही पक्षांनी यंदाच्या निवडणुकीत दोन नवे तरुण चेहरे उतरवले होते. यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर कंगनाने हिंदुत्वाचा प्रचार करत लोकांची मने वळवण्याचा प्रयत्न केला होता. तर, विक्रमादित्य सिंह हा सुरुवातीपासूनच एक मातब्बर राजकारणी आहे.

 

Protected Content