मुंबई वृत्तसंस्था । अभिनेता संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅन्सर झाला आहे. संजय दत्तच्या या आजाराबद्दल पत्नी मान्यता दत्तने सांगितले की “संजू लढवय्या आहे. आम्ही सर्वजण या परिस्थितीवर मात करुन विजेते म्हणून बाहेर पडू.” कुठल्याही अफवांना बळी पडू नका असे तिने संजय दत्तच्या चाहत्यांना आवाहन केले आहे.
संजय दत्तच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या तसेच या आजारातून तो लवकरात लवकर बरा व्हावा, यासाठी त्याला शुभेच्छा देणाऱ्यांचे मान्यता दत्तने आभार मानले आहेत.“ मागच्या काही वर्षात आमचे कुटुंब अनेक अडचणीतून गेले आहे. हा काळ सुद्धा जाईल” संजू लढवय्या आहे. देवाने परीक्षेसाठी पुन्हा एकदा आम्हाला निवडले आहे” असे मान्यता दत्तने म्हटले आहे.
संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचे काल निदान झाले. कालच अभिनेता संजय दत्तने एक ट्विट करुन कामातून ब्रेक घेत आहोत असं म्हटलं होतं. वैद्यकीय उपचारासाठी हा ब्रेक असून मी लवकरच परत येईन असंही संजय दत्तने म्हटलं होतं. . संजय दत्तची करोना चाचणीही झाली होती. ज्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता.