पंतप्रधानांच्या व्हिडीओ वर अभिनेता प्रकाश राज ची मिश्कील टिप्पणी

raj modi

 

मुंबई प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओने जगभरात लक्ष वेधले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तामिळनाडूच्या महाबलीपुरममध्ये मोदी यांनी समुद्रकिनाऱ्याची साफसफाई केली. त्यावर चर्चा होत असून दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी मात्र व्हिडिओचे कौतुक करणाऱ्यांना कानपिचक्या दिल्या असून राज यांनी केलेल्या ट्विटनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. तामिळनाडूतील महाबलीपुरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची दोन्ही देशांदरम्यानच्या द्विपक्षी संबंधांबाबत दोन दिवस अनौपचारिक चर्चा होती. या भेटीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पंतप्रधान मोदी मॉर्निंग वॉकला गेलेले असताना त्यांनी समुद्रकिनाऱ्यावर फेकलेला प्लॅस्टिकचा कचरा वेचला. हा व्हिडिओ त्यांनी अधिकृत ट्वटिर अकाऊंटवरून पोस्टही केला. हा व्हायरल झालेला व्हिडिओ शेअर करत अभिनेते प्रकाश राज यांनी सुरक्षा यंत्रणांना सवाल केला आहे. “आमचे वरिष्ठ सुरक्षा कोठे आहे .. तुम्ही त्याला कॅमेरामनच्या खाली साफसफाईसाठी का सोडले आहे? परदेशी शिष्टमंडळ येथे असताना संबंधित विभागांनी परिसर स्वच्छ केला नाही, अशी हिम्मत कशी करायची ..” # न्यायमूर्ती “, असे अभिनेता यांनी ट्विट केले.

Protected Content