यावल प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज मर्यादेत जळगाव संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात करिअर कट्टा अंतर्गत आज उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
करियर कट्टाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञान समृद्ध करून त्यांचा सर्वांगीण विकास करणे, त्यांना करिअरची योग्य दिशा दाखवणे व तशा संधी उपलब्ध करून देणे, या हेतूने प्रत्येक महाविद्यालयात करियर कट्टा स्थापन करण्यात आलेला आहे. असे विचार महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी उपक्रमात व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांनी भूषविले. यशवंत शितोळे यांनी करियर कट्टा संबंधी शासनाची योजना व त्याची उद्दिष्टे याची सविस्तर माहिती दिली. अध्यक्ष डॉ. संध्या सोनवणे यांनी ही योजना यशस्वीपणे राबविण्याचे आश्वासन दिले. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव करियर कट्टा विभागीय समन्वयक डॉ. सचिन नांद्रे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी केले तर आभार डॉ. एस.पी.कापडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य प्रा.अर्जुन पाटील, प्रा. एस.आर. गायकवाड, प्रा. संजय पाटील, डॉ. पी. व्ही. पावरा यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास सर्व शिक्षक उपस्थित होते.