एक महिना थकितांवरही वीज तोडण्याची कारवाई

ग्राहकांना थकीत वीजबिल एकाच वेळी भरावे लागणार

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महावितरण विभागाने आता थकीत वीजबिल वसुलीवर भर दिला आहे. त्यानुसार आता वीज ग्राहकांचे वीजबिल एक महिना जरी थकीत असेल, तरी वीज तोडण्याची कारवाई होोणार आहे. तसेच वीज ग्राहकांना थकीत बिल हप्त्यांमध्ये भरता येणार नसून पूर्ण बिल भरावे लागणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

घरगुती, वाणिज्य, औद्योगिक या तीनही वर्गवारींमध्ये वीजबिल थकीत असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. थकीत वीजबिलामुळे महावितरणचे नुकसान होते. त्यामुळे महावितरण विभागाने एक परिपत्रक काढून एक महिना जरी वीजबिल थकीत असेल, तरी वीज जोडणी तोडण्याचे आदेश दिले आहेत. वीज जोडणी तोडण्यापूर्वी संबधित ग्राहकांना नोटीस दिली जाणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. या मुदतीत संबधितांनी वीजबिल न भरल्यास वीज कनेक्शन तोडले जाणार आहे.

दरम्यान, यापूर्वी महावितरणने थकीत वीज बिलाचे टप्पे करून हप्त्यांमध्ये बिल भरण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. आता ही पद्धत बंद केली असून, ग्राहकांना थकीत वीजबिल एकाच वेळी भरावे लागणार आहे, याबाबतचे परिपत्रक दि.१ फेब्रुवारी रोजी काढण्यात आले आहे

Protected Content