विद्यार्थांकडून नियमापेक्षा जास्तीचे पैसे घेतल्यास कारवाई : प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले

c9a867a4 188f 405e a515 ec0f10c86aef

 

फैजपूर (प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्रात इयत्ता १२ वी चा निकाल जाहीर झालाय. तर १० वीचा निकाल काही दिवसातच लागणार आहे. त्यामुळे पुढील शिक्षणसाठी विद्यार्थांना विविध दाखल्यांची गरज असते. परंतू या दाखल्यांसाठी नियम बाह्य पैसे घेत असल्याच्या अनेक तक्रारीनंतर समोर आल्यानंतर प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी विद्यार्थांकडून नियमापेक्षा जास्तीचे पैसे घेतल्यास थेट कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

 

विद्यार्थांना प्रवेशासाठी जातीचे दाखले, नॉन क्रीमिलीयर, राष्ट्रीय रहिवास दाखला या दाखल्यांची आवश्कता असते. त्यासाठी यावल-रावेर तालुक्यातील यावल तहसील कार्यालय व रावेर तहसील कार्यालय येथे व शासनाने रावेर-यावल तालुक्यात नेमून दिलेल्या महा-ईसेवा याठिकाणी मुळ कागदपत्रासह याठिकाणी दाखले काढण्यासाठी जात असतात. या दाखल्यांसाठी ५० ते ६० रुपये खर्च येत असतो. नुकताच १२ वी चा निकाल लागला असून फैजपूर उपविभागीय कार्यालय अंतर्गत फैजपूर प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी मागील ६ महिन्यापूर्वी ऑनलाईन दाखले देण्याचे सुरु केले आहे. त्यांच्या या संकल्पनेतून दाखले मिळण्यास कोणताही वेळ लागत नाही. दाखले काढण्यासाठी थेट मुळ कागदपत्रे उदा. शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड झेरोक्स, वडिलांचे जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले मूळ कागदपत्र महा-ईसेवा येथे स्कॅन व अपलोड करून याचा डाटा थेट प्रांतधिकारी यांच्याकडे जात असतो. तपासणी झाल्यानंतर ते प्रमाणपत्र डीजीटल साक्षरीचे प्रमाणपत्र संबंधित महा-ईसेवा केंद्रात मिळत आहे.

 

नुकताच १२ वी चा निकाल लागला असून पालकांनी आतापासून पुढील अभासाक्रमासाठी आवश्यक दाखले काढण्यासाठी महा-ईसेवा केंद्र अथवा यावल-रावेर तहसील कार्यालय येथे मुळ कागदपत्र सादर करून दाखले वेळेवर काढून घ्यावेत. विविध दाखले काढण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या ५० ते ६० रुपये खर्च अपेक्षित असून याची पावती घेणे आवश्क आहे. परंतू खाजगी पंटर अव्वाच्या सव्वा फी घेवून दाखले काढण्यास ५०० ते १००० रुपये घेत असल्याचे चित्र आहे. अशा पंटरांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

 

शासनाने ठरवून दिलेल्या महा-ईसेवा चालकांनी नियमापेक्षा जास्त पैश्यांची मागणी केल्याचे आढळून आल्यास संबंधित चालकाची तक्रार आल्यास त्या महा-ईसेवा चालक त्याचा अहवाल वरिष्ठांकडे कायस्वरूपी बंद करण्यासाठी अहवाल पाठवणार असल्याचा इशारा डॉ. अजित थोरबोले यांनी दिला आहे. तसेच पालकांनी सुद्धा वेळेत दाखले काढून घेणे आवश्क आहे. वेळेवर दाखले काढण्यासाठी पालक आग्रही असतात. दाखले मिळवण्यासाठी कमीत कमी 7 दिवसात लागतात, असेही यावेळी डॉ. अजित थोरबोले यांनी दिले.

Add Comment

Protected Content