Home क्राईम गावठी पिस्तूल घेवून दहशत माजविणाऱ्यांवर कारवाई; एकाला अटक, दुसरा फरार

गावठी पिस्तूल घेवून दहशत माजविणाऱ्यांवर कारवाई; एकाला अटक, दुसरा फरार

0
404


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील भिलाटी भागात गावठी पिस्तूल घेवून दहशत माजविणाऱ्या दोन जणांवर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी २७ मे रोजी दुपारी २ वाजता कारवाई केली आहे. याप्रकरणात पोलीसांनी एकाला अटक करण्यात आली असून दुसरा फरार झाला. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव मेहरूण परिसरातील भिलाटी भागात दोन हाता गावठी पिस्तूल घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी २७ मे रोजी सायंकाळी ६ वाजता कारवाई केली. त्यानंतर पोलीसांनी कारवाई करत विशाल संजय पवार वय २३ रा. भिलाटी, मेहरूण याला ताब्यात घेतले, त्यांच्याकडून ३० हजार रूपये किंमतीचा गावठी पिस्तूल जप्त केला आहे. तर सोबत असलेला संशयित आरोपी विशाल उमरे रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव हा फरार झाला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक किशोर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विशाल संजय पवार वय २३ रा. भिलाटी, मेहरूण आणि विशाल उमरे रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचीन नवले हे करीत आहे.


Protected Content

Play sound