इस्लामपुरा भागात गोमांस बाळगणाऱ्या संशयीतांवर कारवाई

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील इस्लामपुरा परिसरातील एका घरामध्ये गोवंशाची हत्या केली जात असल्याची माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाल्याने पोलिसांचे पथक इस्लामपुरा परिसरात मंगळवारी 18 जून रोजी सकाळी 7 वाजता पोहचले. याठिकाणी एका घरामध्ये छापा टाकला असता, पोलिसांना त्याठिकाणी गोवंशाची हत्या करताना काही जण मिळून आले. पोलिसांना बघताच काही जण मांस घेवून पळून जात होते. मात्र पथकाने त्यांच्याजवळून गोमांस जप्त केले.

गोवंशाची कत्तल केल्यानंतर उर्वरीत शिंगांसह कातडी गोणीत भरुन ते दुचाकीवरुन (क्र. एमएच १९, बीएन ७८८९) विल्हेवाट लावण्यासाठी एक जण कानळदा रोड केसी पार्क परिसरात आला होता. शनिपेठ पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच पथकाने त्याचा पाठलाग केला. यावेळी दुचाकीस्वार शोएब युनुस शेख (३३, रा. सिटी कॉलनी) हा पोलिसांना बघताच तेथून पळून जात होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग करीत मुसक्या आवळल्या. त्याच्याजवळील गोवंशाचे कातडीसह शिंगे जप्त करण्यात आले. तीन जणांना शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content