जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील पाच गुन्हेगारांना एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत स्थानबध्द करण्यात आले आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, पोलिसांनी जिल्ह्यातील पाच गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. यात शेख तोसिफ शेख अफजल (२८ रा. रावेर); अयुब बशीर तडवी (५७, रा. कुसुंबा, ता. रावेर), मगन मुरलीधर करवले (४३, रा. अटवाडे,_ ता. रावेर) ; पिंपळगाव पोलिस ठाणे हद्दीतील मनोहर उर्फ मोहन कोळी (४७ रा. लोहारी, ता. पाचोरा) तसेच जळगाव तालुक्यातील भोलाणे येथील किरण श्रावण कोळी ( वय २८) या गुन्हेगारांना स्थानबध्द करण्यात आले आहे. या संदर्भातील आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडी यांनी जारी केले आहेत.
जिल्हा प्रशासनाने अलीकडच्या काळात अनेक सराईत गुन्हेगारांना एमपीडीए अंतर्गत स्थानबध्द केले असून आता यात पुन्हा पाच आरोपींची भर पडली आहे. यामुळे गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे.