रेकॉडवरील गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे १० गंभीर गुन्हे दाखल असलेला हनुमार नगरात राहणारा रेकॉर्डवरील गुन्हेगाराला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुंबई मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश काढले आहे

भुसावळ शहरातील हनुमान नगरात राहणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार चेतन उर्फ गुल्ल्या पोपट खडसे (वय-२९) याच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात ६ तर प्रतिबंधक कारवाई असलेले ४ असे एकूण वेगवेगळे स्वरूपाचे १० गुन्हे दाखल आहेत, हा धोकादायक गुन्हेगार असल्याचा प्रस्ताव भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे बबन आव्हाड यांनी प्रस्ताव तयार केला होता, हा प्रस्ताव त्यांनी ८ ऑगस्ट रोजी जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागाला सादर केला. त्यानुसार या प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर केला. दरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी  गुन्हेगार चेतन उर्फ गुल्ल्या पोपट खडसे (वय-२९) रा. हनुमान नगर भुसावळ याला मुंबई मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीखक किसन नजन पाटील, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनील दामोदरे, जयंत चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर पाटील यांनी गुन्हेगाराला ताब्यात घेऊन मुंबई येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यासाठी रवाना केले, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी  दिलेल्या प्रसिद्धी पत्रकांवर कळविले आहे.

Protected Content