जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनीत बेकायदेशीर गावठी दारूची विक्री करणाऱ्या दोन महिलांवर आज रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास कारवाई करत दोघांकडून सुमारे ९ हजार ६०० रूपये किंमतीची दारू हस्तगत केली आहे. याप्रकरणी दोन्ही महिलांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील मंगलपूरी भागात दोन महिला बेकायदेशील गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी मिळाली. त्यानुसार पोलीस नाईक चेतन सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल गोविंदा पाटील, धिरज भगत, महीला पोलीस कॉन्स्टेबल राजश्री अर्जून बाविस्कर, निलोफर जाहांगीर सैय्यद, मुद्दस्स काझी, सुधीर साळवे, असीम तडवी, किरण जोरी अश्यांचे पथक कारवाईसाठी रवाना केले. आज रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास पोलीसांनी रामेश्वर कॉलनीतील मंगलपूरी भागात छापा टाकून संशयित आरोपी महिला लक्ष्मी चंदन मलके (वय-३९) आणि पुष्पाबाई धर्म ठाकूर (वय-३४) दोन्ही रा. मंगलपूरी, रामेश्वर कॉलनी यांना ताब्यात घेतले असून दोघांकडून अनुक्रमे ५ हजार ४०० आणि ४ हजार २०० रूपये किंमतीची दारू हस्तगत केली आहे. दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.