मुंबई मनपाच्या दोन कंत्राटदारांवर कारवाई : तीन व्यावसायिक गटांवर छापे

income tax department

मुंबई वृत्तसंस्था । महाराष्ट्रात सध्या हाय व्होल्टेज राजकीय नाटक सुरू आहे. त्यातच प्राप्तिकर विभागाने मुंबई महानगरपालिकेच्या दोन कंत्राटदारांवर कारवाई केली आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेसाठी काम करणाऱ्या तीन व्यावसायिक गटांवर छापे टाकण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

 

आतापर्यंत बोगस खर्च आणि भांडवली शेअर्सच्या प्रीमियमद्वारे भांडवली हस्तांतरणाच्या स्वरूपात २७५ कोटी रूपयांपेक्षा अधिक तफावत असल्याची माहिती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली आहे. राज्यात सध्या राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. भाजपा आणि शिवसेनेमधूल मतभेद वाढत असतानाच हे छापे टाकण्यात आले आहेत. सोमवारी संध्याकाळपर्यंत आयकर विभागाद्वारे छापे टाकण्याचे काम सुरू होते. दरम्यान, ही रक्कम ३०० कोटी रूपयांच्या जवळपास जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Protected Content