तलवार हातात घेवून दहशत माजविणाऱ्या तरूणावर कारवाई

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगरातील संताजी नगर परिसरात बेकायदेशीर हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या तरूणावर मुक्ताईनगर पोलीसांनी करवाई केली आहे. त्याच्या जवळून लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, मुक्ताईनगर परिसरातील संताजी नगर परिसरात संशयित आरोपी पवन प्रल्हाद सोनवणे (वय-२८)  हा तरूण हातात बेकायदेशीरित्या तलवार घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप दुनगहू यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने कारवाई करत संशयित आरोपी पवन सोनवणे यांच्याकडून दोन फूट लांबविली लोखंडी तलवार हस्तगत केली. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल गजानन जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजीव पाटील करीत आहे.

Protected Content