Home क्राईम कारण नसतांना महिलेला दारूच्या नशेत दोघांकडून शिवीगाळ

कारण नसतांना महिलेला दारूच्या नशेत दोघांकडून शिवीगाळ


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कांचन नगरात राहणाऱ्या महिलेला दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनीपेठ पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, दुर्गाबाई पितांबर सोनार (वय-४५) या महिला आपल्या परिवारासह जळगाव शहरातील कांचन नगर परिरात वास्तव्याला आहे. शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांच्या गल्लीत राहणारे दिपक शिवनारायण पाटील व माधुरी दिपक पाटील या दोघांनी कारण नसतांना शिवीगाळ केली. तर दिपक पाटील याने दारूच्या नशेत गल्लीत मोठमोठ्याने आरडाओरड करून परिसरातील शांततेचा भंग केला. याप्रकरणी महिलेने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिपक शिवनारायण पाटील व माधुरी दिपक पाटील या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय मराठे करीत अहे.


Protected Content

Play sound