नांदुरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पातोंडा नवीन गावठाण येथे अवैध गुटखा आणि दारू विक्री करणार्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे.

अवैध गुटखा विक्री करणार्यास स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा तसेच सुगंधीत पान मसाला ६६८८० रुपये तसेच देशी दारुचे बॉक्स ५६ हजार व वाहतूक करणारी वॅगन कार असा एकूण ३ लक्ष २२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संबंधीत कारवाई नांदुरा हद्दीतील पातोंडा नवीन गावठाण ता. नांदुरा येथे करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेला देशी दारु व शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्या विक्री होत असल्याची माहिती मिळाली असता माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवार दि १८ मे रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान नांदुरा हद्दीतील आरोपी सुनिल बळीराम नेमाडे ( वय ३३ वर्ष रा. पातोंडा नविन गावठाण ता. नांदुरा ) यांच्या येथे छापा टाकून १६ देशी दारु बॉक्स ९० एम एल चे किंम ५६ हजार तसेच महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा सुगंधित तंबाखू विमल पान मसाला एकूण ६०८ गुटखाचे पाकिटे ६६ हजार ८८० व २ लक्ष रुपयाची वॅगन कार असा एकूण ३ लक्ष २२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक सुनिल कडासणे, अप्पर पोलिस अधिक्षक खामगाव, बुलढाणा व स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख अशोक लांडे यांच्या मार्गादर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील राजू टेकाळे, गणेश पाटिल , अनंत फरतळे, गणेश शेळके, ड्रायव्हर पोलिस नाईक राहुल बोर्डे व ड्रायव्हर राहुल बोर्डे यांनी केली. आरोपीवर नांदुरा पोस्टे. ला भादंवीचे कलम ३२८,१८८,२७३ कलम अन्नसुरक्षा मानके कायदा कलम २००६ कलम २६ (२) (खत) शिक्षा पात्र कलम ५९ (१) ऑइमे सहकलम ६५ (ई) मदाका. नुसार कारवाई करण्यात आली आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.