वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई; चालकास अटक

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी २५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता वरणगाव शहराजवळील आस्वाद हॉटेल जवळ कारवाई केली असून डंपर चालकाला अटक करण्यात आले आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात बुधवारी २६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील आस्वाद हॉटेलजवळून अवैधपणे वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी २५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता डंपर क्रमांक (एमएच १९ झेड ४०२४) वर कारवाई केली. त्यावेळी चालक नामदेव बळीराम नन्नवरे वय ४५ रा.बांभोरी ता.धरणगाव यांच्याकडे कागदपत्रे नसल्याचे समोर आले. दरम्यान पोलीसांनी वाळूने भरलेले डंपर जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक श्रीकृष्ण खंडेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक नामदेव बळीराम नन्नवरे वय ४५ रा.बांभोरी ता.धरणगाव याच्यावर वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश राठोड हे करीत आहे.

Protected Content