जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीला मानेवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार करणाऱ्या फरार संशयित आरोपीला शनीपेठ पोलीसांनी मंगळवारी १३ सप्टेंबर रोजी अटक केली आहे.
शनिपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील शनिपेठ हद्दीत २० वर्षीय तरुणी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. १ सप्टेंबर रोजी रात्री ११ ते १२ वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी विनोद सुकलाल भोळे याने तरुणीच्या घरात येऊन तिच्या मानेला चाकू लावून तिला ओढत तिच्या घराच्या मागे नाल्याजवळ घेऊन गेला. त्यानंतर पुन्हा घरात आणून तिच्या हाताच्या बोटावर चाकू मरून तिला जखमी केले व खाटेवर ढकलून दिले. त्यानंतर जबरदस्ती तिच्यावर दोन वेळा अत्याचार केला होता. दरम्यान या संदर्भात तरुणीच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विनोद सुकलाल भोळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी विनोद भोळे हा फरार झाला होता. शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी राहूल पाटील, परिस जाधव, अनिल कांबळे, विजय निकम यांनी मंगळवारी १३ सप्टेंबर रोजी दुपारी संशयित आरोपी विनोद भोळे याला कुसुंबा येथील मुर्तीकाराच्या शेडच्या मागून अटक केली आहे. त्याच्यावर कारवाई करण्याचे काम सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण करीत आहे.