मुंबई वृत्तसंस्था | म्हाडा पेपरफुटी होण्यापूर्वीच आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी आज होणारी म्हाडाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थी अभ्यास करत आजच्या परीक्षेची वात पाहत होते. मात्र आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणासंदर्भात चौकशी होतांना आरोपींशी झालेल्या संवादात त्याने म्हाडाच्या पेपरबाबत उल्लेख केला होता. तोच धागा पकडत पेपर फोडण्याआधीच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे. मात्र अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून हा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. असे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
पेपर फुटलाच नाही, मात्र परीक्षेआधीच गोपनीयेतेचा भंग झाला त्यामुळे आज होणारी ही परीक्षा पुढे धक्ण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा फी ही परत केली जाणार असून यापुढे या विद्यार्थ्यांना परीक्षा फी न भरता परीक्षा देता येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.