बलात्कारप्रकरणी फरार आरोपी भुसावळ येथून ताब्यात

103582220 d7a93222 ef18 4936 8db7 0d9e48a68773

जळगाव, प्रतिनिधी | बोदवड येथे बलात्कार व लैंगिक छळप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपीस आज स्थानिक गुन्हे शाखेने भुसावळ येथील एम.आय.डी.सी. एरियातून ताब्यात घेवून बोदवड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

 

अधिक माहिती अशी की, बोदवड येथे मार्च २०१९ मध्ये घडलेल्या बलात्कार व लैंगिक छळाच्या गुन्ह्यात भुसावळ येथील खडका रोड भागातील रहिवासी असलेला संशयित आरोपी आकाश भगवान माळी हा फरार झालेला होता. तो आज भुसावळ येथील एम.आय.डी.सी. भागात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून भुसावळ येथील स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहम यांनी सहाय्यक फौजदार अशोक महाजन, राजेंद्र काशिनाथ पाटील, विनोद सुभाष पाटील, किशोर राठोड, अरुण राजपूत व रणजीत जाधव यांच्या पथकाला तत्काळ रवाना करून आकाशला ताब्यात घेवून पुढील कारवाईसाठी बोदवड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Protected Content