Home क्राईम मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; पाच ठार,२५ जखमी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; पाच ठार,२५ जखमी


Accident
 

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे खंडाळा घाटात अमृताअंजन पुलाजवळ एक खासगी बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील पाच जणांचा मृत्यू झाला असून २५ प्रवासी जखमी झाले आहेत.

ही बस कराडहून मुंबईला येत होती. बसच्या चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं बस रस्त्याची कडा ओलांडून दरीत कोसळली. या भीषण अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये एक 2 वर्षांच्या मुलाचा देखील समावेश आहे. या व्यकिरिक्त एक तरूणी, एक पुरूष आणि एका महिलेचा सुद्धा समावेश आहे. घटनास्थळी देवदूत संस्थेचे सदस्य, महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस यांच्या मदतीनं बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.


Protected Content

Play sound