रावेर (प्रतिनिधी) आयशर गाडीने मोटार सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटार सायकल स्वार व त्याची आई जखमी झाल्याची घटना सोमवारी तालुक्यातील कर्जोत गावानजीक घडली.
या बाबत वृत्त असे की, सोमवारी दुपारी आयशरने ( क्र.MP 68 H 0177 ) कर्जोत गावाजवळ अंबादास महाजन यांच्या शेतासमोर मोटार सायकलला धडक दिली व चालक वाहन घेऊन पसार झाला. या अपघातात आसाराम राठोड व त्यांची आई सरस्वतीबाई ( रा. मेथखारी ता.जि.बु-हाणपुर) हे जखमी झाले आहेत. या बाबत सूचन चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रक चालकाविरुध्द भादंवी 279, 337, 338 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.