Home Cities एरंडोल भरधाव कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; एक जागीच ठार

भरधाव कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; एक जागीच ठार


Err

एरंडोल(प्रतिनिधी)। जळगावहून पिंपरखेड येथे एरंडोल मार्गे जाणाऱ्या दुचाकीला समोरून येणाऱ्या कंन्टनरने जोरदार धडक दिल्याने 52 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून त्याची विवाहित मुलगी किरकोळ जखमी झाल्याची घटना सायंकाळी 7.15 वाजेच्या सुमारास घडली. ही घटना एरंडोल येथून जवळच असलेल्या प्रियंका हॉटेलजवळ घडली आहे.

याबाबत माहिती अशी की, पिंपळखेड येथील रहिवाशी विक्रम पाटील (वय-52) हे दवाखान्याच्या निमित्ताने आपल्या विवाहित मुलीसोबत दुचाकी क्रमांक एमएच 19 बीडी 6618 जळगाव गेले. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास जळगावहून पिंपरखेड येथे एरंडोलमार्गे जात असतांना एरंडोल गाव येण्याच्यापुर्वी हॉटले प्रियंका जवळ 7.15 वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनर क्रमांक (एमएच 19 झेड 4124) ने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरून विक्रम पाटील हे कंटेनरच्या पुढच्या चाकात आल्याने जागीच ठार झाले तर विवाहित मुलगी किरकोळ जखमी झाली. याबाबत रात्री उशीरापर्यंत कंटेनरचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound