यावल प्रतिनिधी । चुंचाळे गावाजवळ ४०७ वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी चालक जागीच ठार झाला असून त्याच्या पाठीमागे बसलेला गंभीर जखमी झाला आहे.
यावल-चोपडा मार्गावर चुंचाळे गावाजवळ झालेल्या मोटरसायकल आणी एका चारचाकी वाहनाच्या झालेल्या भिषण अपघातात जळगाव येथील एकाचा जागीच मृत्युतर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
आज दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास चोपडा यावल मार्गावरील चुंचाळे गाव फाटयापासुन काही अंतरावर अपघात झाला. जळगावकडुन यावलकडे जाणार्या मोटरसायकल क्रमांक एमएच १९ सी क्यु २९९०या दुचाकी वाहनाने मुकेश लोटन सोनार ( वय ४९, रा. पिंप्राळा मयूर नगर, जळगाव) हे दागीन्यांचे कारागीर आपल्या रूपेश बळीराम सोनार ( वय ३६ वर्ष, रा. रेणुका नगर मेहरूण) हे किनगावहुन यावलला निघाले होते.
दरम्यान, साकळीकडुन चोपड्याकडे जाण्यार्या ४०७चारचाकी मोटर वाहन क्रमांक एमएच १९,४१००यावरील चालक शेख सलीम शेख अब्दुल्ला याने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मोटरसायकल चालक मुकेश लोटन सोनार यास डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच मरण पावले. त्यांच्या सोबत असलेल्या रूपेश बळीराम सोनार यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचाराससाठी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुकेश सोनार यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ .बी बी बारेला हे करीत असुन, घटनेचा तपास पोलीस निरिक्षक अवतार सिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार सहाय्यक फौजदार अजीज शेख हे करित आहेत.