कर्जबाराला कंटाळून विष घेतलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू; नातेवाईकांचा अक्रोश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सततची नापिकी आणि कर्जबाराला कंटाळून कंडारी येथील तरूण शेतकऱ्याने राहत्या घरात पिकांवर फवारणीचे औषध घेतल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी २५ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. समाधान एकनाथ धनगर वय ४० रा. कंडारी ता.जळगाव असे मयत झालेल्या तरूण शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, समाधान धनगर हा तरूण आपल्या परिवारासह कंडारी गावात वास्तव्याला होता. शेतीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. गेल्या काही वर्षांपासून शेतातील सततची नापीकी आणि झालेल्या कर्जबाजारामुळे समाधान धनगर हा गेल्या काही दिवसांपासून विवंचनेत होता. त्यामुळे या तणावात असतांना रविवारी २५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता त्याचे पिकांवर फावरणीसाठी लागणारे विषारी औषध सेवन केले. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली. नातेवाईकांनी त्याला तातडीने खासगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असतांना रात्री ९ वाजता मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई कमलबाई, दोन भाऊ, पत्नी रेखाबाई, मुलं भैय्या आणि गोलू असा परिवार आहे. या घटनेमुळे परिवाराने एका आक्रोश केल्याचे पहायला मिळाले.

Protected Content