जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा येथे घराचे भाडे देण्याच्या कारणावरून घर मालकाने महिलेसह तिच्या मुलाला शिवीगाळ करत जीवेठा मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार रविवारी १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडला आहे. प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घर मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे शोभाबाई विनोद कोळी वय-३८ या महिला आपल्या मुलगा व कुटुंबासह निलेश दिलीप पाटील यांच्या घरात भाड्याने राहतात. रविवारी १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घर भाडे देण्याच्या कारणावरून निलेश पाटील याने महिलेसह तिचा मुलगा महेश कोळी यांना शिवीगाळ केली. तसेच महेश कोळी याला जमिनीवर ढकलून देवून जीवेठार मारण्याची धमकी दिली आणि घरातील सामानावर डिझेल टाकून पेटवून देईल अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार सायंकाळी ७ वाजता घरमालक निलेश दिलीप पाटील याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गफुर तडवी हे करीत आहे.