यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेला दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीने दुसऱ्याच्या हस्ते पाठविले. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला शिवीगाळ व दमादाटी केल्याचा प्रकार गुरूवारी रात्री ९ वाजता घडला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका आदिवासी गावात४० वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरूवारी ११ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास महिला ही पायी रस्त्याने जात असतांना संशयित आरोपी मुबारक तडवी याने दारूच्या नशेत महिलेस पाहुन दुर्गेश बारेला या व्याक्तीच्या हस्ते एकटी पाहून पैसे पाठविले. महिलेने पैसे घेण्यास नकार दिला. याचा राग आल्याने मुबारक तडवी याने महिलेला शिवीगाळ करत दमदाटी केली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रात्री यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.
यावल तालुक्यात अनेक ठिकाणी मोठया प्रमाणे सर्रासपणे सार्वजनिक ठिकाणी गावठी हातभट्टी, पन्नीची दारू विक्रीला जात असून या दारू विक्रीमुळे अनेकांचे कुटुंब उध्दवस्त झाले आहे. अल्पवयीन मुले दारूच्या आहारी जावून व्यसनाधीन होवून मयत झालेले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या दारू विक्रीस पायबंद करावी अशी अनेक ठिकाणाहुन मागणी होत आहे.