वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना शनिवारी ६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी रात्री ११ वाजता तीन जणांविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी कि, वरणगाव पोलीस ठाण्यात शनिवारी ६ एप्रिलरोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पोलीस कर्मचारी योगेश पाटील हे आपले कर्तव्य बजावत असतांना भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे राहणारे महेंद्र काशिनाथ पाटील, राहूल काशिनाथ पाटील आणि ज्योती काशिनाथ पाटील हे पोलीस ठाण्यात आलेले होते. दरम्यान पोलीस कर्मचारी योगेश पाटील यांनी राहूल पाटील याला विचारपूस केली. याचा राग आल्याने तिघांनी पोलीस कर्मचारी योगेश पाटील यांना शिवीगाळ करत वाद घातला. त्यानंतर शासकीय कामात अडथळा निर्माण करत धमकी दिली.
हा प्रकार घडल्यानंतर रात्री ११ वाजता पोलीस कर्मचारी योगेश पाटील यांनी वरणगा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार महेंद्र काशिनाथ पाटील, राहूल काशिनाथ पाटील आणि ज्योती काशिनाथ पाटील तिघे रा. फुलगाव ता. भुसावळ यांच्या विरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहे.