लोकप्रतिनिधींच्या नावाचा गैरवापर : जिल्हा प्राथ. शिक्षक महासंघाचा आरोप

08

अमळनेर (प्रतिनिधी) सन २०२० मध्ये जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स.सोसायटी) या संस्थेची सार्वञिक निवडणूक चुरशीची होणार आहे. त्यात लोकमान्य व प्रगती गटातील निष्ठावंतांना सोबत घेवून लढण्याचा मनोदय सहकार गटातील फुटीर गट व बी.बी.पाटील गटाने अध्यक्ष निवडप्रसंगीच व्यक्त केला आहे. ही मंडळी आमदार, खासदार व मंञी यांच्या नावाचा गैरवापर करून सभासदांमध्ये प्रतिष्ठा निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष रावसाहेब मांगो पाटील व सरचिटणीस योगेश सनेर यांनी एका संयूक्त पञकाद्वारे केला आहे.

 

लोकमान्य गटाची सन २००८-०९ मध्ये सत्ता असतांना त्यात प्रगती गटाचे एक संचालक सहभागी होते. त्यात लोकमान्य गटाची एकहाती सत्ता असतांना १७ संचालकांना सभासदांनी निवडून दिलेले होते परंतु सत्ता पद पैशांच्या हव्यासपोटी १४ संचालक लोकमान्य गटातून बाहेर पडले. कोणताही गट अशा गद्दांरांना उमेदवारी देत नव्हता, त्यावेळी प्रगती गटाकडे उमेदवारीची याचना करीत त्यांनी उमेदवारी मिळवली आणि ऐनवेळी सहकार गटात दाखल झाले. सुरवातीपासूनच गद्दारी करणाऱ्यांना सहकार गटाने उमेदवारी दिली. सन २०१५ च्या निवडणुकीत तिकीटे देवून सत्तेचा गैरवापर करून सर्व संचालकांना निवडून आणले. चार वर्षात सर्वांनी सत्तेची फळे चाखली, ५४ पदांच्या नोकरभरतीचा प्रस्ताव सादर करणाऱ्या संचालकांनी एकञ येवून बेकायदेशीरपणे ६३ पदांची नोकरभरती केली. त्यात आपल्या बायका पोरांसह नातेवाईकांना संधी दिली. शेवटच्या सञात पद, पैसा व प्रतिष्ठेसाठी सहकार गटात फुट पाडून वेगळा गट स्थापन केला. सत्ता, पैसा व पदासाठी कोणत्याही गटावर निष्ठा नसतांना हेच लोक पुन्हा निष्ठावान व मातब्बरांना सोबत घेवून आगामी निवडणुक लढण्याचे मनसुबे बाळगत आहेत. आगामी काळात या आयाराम गयारामांना सभासद त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. लोकमान्य, प्रगती व सहकार गटाशीही गद्दारी करणाऱ्यांना सभासद कधीही माफ करणार नाहीत. असेही या पत्रकात म्हटले आहे.

Add Comment

Protected Content