लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पहूर पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की,जामनेर तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याच गावातील राहणारा संशयित आरोपी जगदीश अशोक पवार याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार सहन न झाल्याने पीडित मुलीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. यासंदर्भात पहूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवार १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता संशयित आरोपी जगदीश अशोक पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.

 

Protected Content