जळगाव प्रतिनिधी । आज प्रचाराच्या शेवटच्या दिवसी अभिषेक पाटील यांनी आज शनिवार (दि. १९) रोजी शिवाजीनगर परिसरातील खडकी चाळीतील दक्षिण मुखी हनुमान मंदिरापासून प्रचाराला सुरुवात करण्यात आली.
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी आज शिवाजीनगर परिसरातील खडकी चाळ येथून दक्षिणमुखी हनुमान मंदिरापासून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. महाआघाडीचे उमेदवार पाटील यांच्या प्रचार रॅलीत आबालवृद्ध यांनी ढोल ताशांच्या गजरामध्ये सहभाग घेतला होता. ही प्रचार रॅली विसनजी नगर, दुध फेडरेशन, खडकी चाळ आणि बिस्मिल्ला नगर परिसरात काढण्यात आली. पाटील यांच्या प्रचार रॅलीत महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. पाटील यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.