पारोळा येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

parola 1

पारोळा प्रतिनिधी । तालुक्याचे आराध्य दैवत श्री बालाजी संस्थानच्या वतीने ब्रह्मोत्सवाच्या आज शेवटच्या दिवशी समारोपनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १५ ते १६ हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.

कार्यक्रमास श्री बालाजी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली. यावेळी मुख्य विश्वस्त श्रीकांत शिंपी, शामकांत शेंडे, कार्याध्यक्ष रावसाहेब भोसले, वसंतराव शेंडे, डॉ.अनिल गुजराथी, शशिकांत शेंडे, प्रकाश शिंपी, अभय शिंपी, डॉ.नंदू सैंदाणे, अरुण वाणी, केशव क्षत्रिय, संजय कासार, चंद्रकांत शिंपी, दिलीप शिरुडकर, बापू शिंपी, डी. डी.वाणी, प्रमोद शिरोळे, राजू चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तसेच यावेळी माजी खा.ए.टी.पाटील, माजी आ.चिमणराव पाटील, आमदार डॉ.सतीश पाटील, माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांनी भेट देऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. दुपारी आरती झाल्यानंतर १ वाजता महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली. सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.

पारोळ या तालुक्यातून व शहरातून १५ ते १६ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी लक्ष्मी गोविंदा, बालाजी महाराज की जय
अशा बालाजी भक्तगण घोषणा देत होते. या भक्तांचे ब्रह्मोत्सवात मिळाले. १४ ते १५ दिवस सहकार्य संपूर्ण ब्रह्मोत्सवात चंदू पाटील, सुजित शेंडे, निलेश चौधरी, सोनू पवार, प्रसाद पुराणिक, ज्ञानेश्वर चौधरी, छोटू धावणे, बाळू मराठे, घनश्याम ठाकरे, वायरमन भावडू जगताप, अक्षय
चौधरी, दीपक गुरव, भैया चौधरी, हर्षल शिरोळे, राकेश पाटील, राजू पाटील, करण साळी, सोनू शिंपी, अमोल वाणी, हर्षल शेंडे, गोपाल चौधरी, रमेश चौधरी, कुणाल पाटील, गुणवंत चौधरी, निखिल वाणी, सुभाष राजपूत, संकेत दाणेज, भूषण चौधरी, संकेत शिरोळे, रोहन
महाजन, निंबा मराठे, गणेश क्षत्रिय, योगेश चौधरी, मंगेश जगदाळे, संस्कार हिंदुजा, चंद्रकांत महाजन, प्रसाद कासार, सुदर्शन पाटील, प्रवीण महाले, प्रीतेश चौधरी, बुधा बारी, वसंतराव बारी, दयाराम पाटील, प्रकाश चौधरी, कृष्णा बारी, संजय बारी, पांडुरंग बारी, मोतीलाल बारी
यांच्यासह हमाल बांधव, स्वयंसेवक, सेवेकरी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content