जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या महाआघाडीचे जळगावचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी स्वतंत्र अॅप तयार केले असून या माध्यमातून तरूणाईला परिवर्तनाची साद घातली आहे.
अभिषेक पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शहराच्या कान्याकोपर्यातील मतदारांना प्रचार फेर्यांच्या माध्यमातून संपर्क साधण्यास प्रारंभ केला आहे. तसेच ते समाजाच्या विविध स्तरांमधील मान्यवरांच्या भेटीगाठीदेखील घेत आहेत. यासोबत त्यांनी सोशल मीडियातही प्रचाराची धमाल उडवून दिली आहे. अभिषेक पाटील हे स्वत: तिशीच्या प्रारंभीचे तरूण असल्याचे ते सोशल मीडियाच्या विविध मंचांवर सक्रीय आहेत. त्यांच्या जोडीला त्यांचे समर्थकही समाजमाध्यमांचा प्रचारासाठी अतिशय समर्पक वापर करत आहेत. फेसबुक पेज, व्हाटसअॅप, इन्स्टाग्राम, युट्युब, ट्विटर आदींवर त्यांचा प्रचार सुरू आहे. याच्या जोडीला आता त्यांनी स्मार्टफोन अॅप्लीकेशन तयार केले असून यात जळगाव शहरातील मतदारांना परिवर्तन घडविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अभिषेक पाटील अॅप हे गुगल प्ले स्टोअरवर सादर करण्यात आलेले आहे. अर्थात, अँड्रॉइड प्रणाली वापरणारे स्मार्टफोन युजर्स याला इन्स्टॉल करू शकणार आहेत. दरम्यान, या संदर्भात अभिषेक पाटील यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले की, ”जळगावात विकासकामांचा ठणठणाट असून लोकांमध्ये सत्ताधार्यांविरूध्द रोष आहे. विशेष करून तरूणाई शहरातील कामांचा अभाव व त्यातही खड्डयांमुळे प्रचंड प्रक्षुब्ध झालेली असून याचे प्रतिबिंब सोशल मीडियात फार मोठ्या प्रमाणात उमटलेले आहे. या पार्श्वभूमिवर, स्मार्टफोन अॅप्लीकेशनच्या माध्यमातून परिवर्तनाचा संदेश हा अतिशय ठळकपणे मतदारांपर्यंत पोहचवण्यात येत असून याला जळगावकरांचा प्रतिसाद लाभला आहे.”
अभिषेक पाटील अॅप डाऊनलोड लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.election.etech.sarkar_13ap