अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांच्या संकल्पनेला साद देत पाडळसरे येथील तिरंगा गणेश मित्र मंडळाने ‘एक गाव, एक गणपती’ बसवून प्रतिसाद दिला. तिसऱ्या दिवसाची आरती मारवड पोलीस ठाण्याचे एपीआय जयेश खलाने यांच्याहस्ते करण्यात आली.
त्या आधी मंडळाचे अध्यक्ष गौरवकुमार पाटील, उपाध्यक्ष लोकेश गुर्जर, निलेश पाटील, संजय गुर्जर, कल्पेश पाटील, सागर पाटील यांच्याहस्ते शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भागवत पाटील, पत्रकार वसंतराव पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन मंगल पाटील, गोपाल कोळी, माजी उपसरपंच रवींद्र पाटील, भूषण पाटील, अभिमन कोळी आदींसह तिरंगा गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.