‘त्यानं’ पेपरात लिहिली आर्ची-परश्याची लवस्टोरी !

sairatnew1

 

लातूर (वृत्तसंस्था) दहावी बोर्डाच्या परीक्षेत दरवर्षी काही विद्यार्थी गंमतीशीर उत्तरं लिहित असल्याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. यंदा तर एका पठ्ठ्याने चक्क आर्ची-परश्याची अख्खी लव स्टोरी उत्तरपत्रिकेत लिहून काढलीय.

 

मागील वर्षी एका परीक्षार्थ्याने अख्खी उत्तरपत्रिकेत जय श्रीराम़़..जय श्रीराम़़…लिहून ठेवले होते. मंडळाच्या नियमानुसार उत्तरपत्रिकेवर मोबाईल क्रमांक लिहून संपर्क करण्याचा प्रयत्न करणे, उत्तरपत्रिकेचे पान फाडणे, पेपर तपासणी करणाऱ्यास धमकावणे किंवा पास करण्यासाठी विनवणी करणे, असे काहीही लिहिल्यास एक अथवा दोन परीक्षांसाठी संबंधित विद्यार्थ्याला अपात्र ठरविण्यात येते़. परंतु यावर्षी या विद्यार्थ्याने असे काहीही केलेले नाहीय. त्याने फक्त सैराट चित्रपटाची कथा लिहिली आहे. त्यामुळे त्याला ‘त्या’ एका विषयापुरतेच नापास करण्यात आले आहे़. विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत असंदर्भीय काही लिहिले तर ती उत्तरपत्रिका शिक्षकांना नियामकाकडे द्यावी लागते़ त्यांच्याकडून बोर्डाच्या चौकशी समितीकडे सदर प्रकरण येते़.

Add Comment

Protected Content