मुक्ताईनगर कृषी महाविद्यालयात “आरंभ-२के” उत्साहात साजरा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथील कृषी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे आगमन व स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कृषी महाविद्यालयचे अधिष्ठाता, डॉ. संदीप पाटील यांनी भूषविले.

अध्यक्षीय भाषणात त्यांनी ज्ञान संपादन करण्यासाठी व आयुष्यात यशस्वी होण्यासाठी  विद्यार्थी जीवनात सातत्य टिकून ठेवणे, शिस्तीत राहणे व सुजान नागरिक म्हणून जीवन जगणे महत्वाचे आहे. तसेच विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त  शैक्षणिक व प्रात्यक्षिक सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन सुद्धा दिले. कार्यक्रमात उपस्थित असलेले प्रथम वर्षाचे विद्यार्थी यांनी आपली ओळख कृषी महाविद्यालयातील सर्व वरिष्ठ विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना करून दिली त्याचबरोबर या नवीन विद्यार्थ्यांचे मा. सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर डॉ. संदीप पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. गणेश देशमुख यांनी केले. प्रास्ताविकेत त्यांनी विद्यार्थी जीवनात पाळावयाचे नियम आणि सवयी याबद्दल विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने तसेच विद्यापीठ गीताने झाली. त्यानंतर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी आरंभ- २के २०२४ या कार्यक्रमाचे आयेजन वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. सदर कार्यक्रमात नृत्य सादरीकरण, कविता वाचन, गीत गायन आणि वादन इत्यादी कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. वैष्णवी केकाने या विद्यार्थिनीने केले. त्याचबरोबर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी देसाई, कौस्तुभ  होनमाने, सुषमा पाटील, अनिकेत बोरसे यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या स्पर्धात्मक सादरीकरनाचे बक्षीस वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला कृषी महाविद्यालय मुक्ताईनगरचे सहाय्यक कुलसचिव श्री. प्रशांत नागे, शारीरिक शिक्षण निर्देशक डॉ. रियाज शेख त्याचबरोबर डॉ. रमेश चौधरी,  डॉ. बाळासाहेब रोमाडे, प्रा. रंगनाथ  बागुल, प्रा. नामदेव धुर्वे, डॉ. कुशल ढाके,  डॉ. मनीषा पालवे,  डॉ. रवींद्र जाधव, डॉ. तुषार भोसले, डॉ. सागर बंड तसेच लिपिक वर्गीय कर्मचारी व सर्व वरिष्ठ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Protected Content