आम आदमी पक्षाने दिल्लीत फक्त दारू विकण्याचे काम केले !- पालकमंत्री

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देत आम आदमी पक्षावर तीव्र शब्दांत टीका केली. “दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता. आम आदमी पक्षाने दिल्लीत फक्त दारू विकण्याचे काम केले. तसेच पंजाबमध्ये सत्ता मिळाल्यानंतरही आम आदमी पक्ष परिवर्तन करू शकला नाही. याचाच परिणाम दिल्लीच्या निकालावर झाला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

पाटील म्हणाले, “पंजाबमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही. दिल्लीत दारू घोटाळ्यासह अनेक गैरव्यवहार समोर आले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात जावे लागले. त्यामुळे जनता नाराज झाली होती. कामाचा अभाव आणि भ्रष्टाचार यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला.”

भाजपाच्या विजयाचे कौतुक करताना पाटील म्हणाले, “दिल्लीतील जनतेने योग्य निर्णय घेत भाजपाला स्पष्ट बहुमत दिले आहे. महाराष्ट्रात जसे आमचे 237 आमदार निवडून आले, तसेच दिल्लीमध्येही लोकांनी योग्य पर्याय निवडला असता. मात्र, आम आदमी पक्षाने दिल्लीत फक्त दारू विकण्याचे काम केले, त्यामुळे लोकांनी त्यांना सत्तेतून दूर केले.

“जेव्हा एखादी सरकार अतिरेक करते, तेव्हा जनता त्याला उत्तर देत असते. दिल्लीतील निकाल हेच स्पष्टपणे दर्शवतात,” असेही पाटील यांनी सांगितले. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

Protected Content