चोपडा प्रतिनिधी । डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई व्हावी यासाठी चोपड्या तालुक्यातील ५ आदिवासी संघटनानी एकत्र येऊन मुकमोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चामध्ये आसेमं संघटनाचे महासचिव राजु मुशीर तडवी, आसेमं सदस्य रजाक तडवी,सायबु तडवी,गफूर जनाब,शरीफ तडवी, बामसेफचे जिल्हा अध्यक्ष बापू बहारे, आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष गेमा बारेला, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा अध्यक्ष दारासिग पावरा, संजू पाडवी, पारधी महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्ष कांचनताई राणे, भिल्ल समाजाचे नेते रमेश ठाकूर व महिला रजिया तडवी, शबाना तडवी यांच्यासह असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.