सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लोकसेवक मधुकरराव चौधरी यांची दूरदृष्टी रावेर-यावल परिसरासाठी वरदान असलेले गारबर्डी येथील सुकी धरणाचे आमदार शिरीषदादा चौधरी धनंजयभाऊ कार्यकर्ते मित्रपरिवाराच्या वतीने जलपूजन सोहळा उत्साहात घेण्यात आला.
यंदा वरून राजाची चांगली कृपा राहिल्याने पाऊस चांगला आहे. धरण पूर्ण भरले असून ओसंडून वाहू लागल्यामुळे परिसरातील शेतकरी आनंदित झाले आहेत सालाबादप्रमाणे परिसरातील शेतकरी बांधवांच्या सोबत जलपूजन सोहळा आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवार करत आहे. यावर्षी सुद्धा अनेक शेतकरी बांधव जलपूजन सोहळ्याला उपस्थित होते. अनेक शेतकरी बांधवांनी लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या दूरदुष्टीमुळे आपल्याला आज हा परिसर हिरवा दिसत आहेत. या धरणामुळे पाटचारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी दिले जाते, त्यामुळे सर्व जमीन ओली झाली विहीर ट्यूबवेलला पाणी आलेत त्यामुळे सर्व परिसर सुजलाम सुफलाम झालं अश्या अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
यावेळी पं.स.चे माजी सभापती लिलाधर चौधरी, पं.स.चे माजी सदस्य शेखर पाटील, सर्फराज तडवी,ज्ञानेश्वर बऱ्हाटे, प्रशांत पाटील, योगेश पाटील, विलासशेठ तायडे, गोंडू महाजन, रमेशदादा महाजन, काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर पाटील, सुनील फिरके, राजू सवरने, प्रल्हाद बोंडे, सुनील कोंडे, न्हावी सरपंच देवेंद्र चोपडे, बामनोद सरपंच राहुल तायडे, चितोडा सरपंच अरुण पाटील, पिंप्री सरपंच रोहिदास कोळी, चिनावल सरपंच ज्योतीताई भालेराव, गारखेडा सरपंच रतन बारेला, पाल सरपंच कामिल तडवी, मारुळ जावेद जनाब, भालचंद्र भंगाळे, सांगवी सरपंच रशीद तडवी, कुसुम्बा सरपंच मुकेश पाटील, लोहारा सरपंच लियाकत जमादार विकास धांडे, विकास भंगाळे, पिरंन तडवी, तुकाराम बोरोले, चंद्रकांत भंगाळे, डॉ सुरेश पाटील, म.सा.का माजी संचालक अनिल महाजन, मिलिंद नेहेते, नत्थू रमजान तडवी, सातपुडा विकास मंडळ पाल अध्यक्ष अशोक झांबरे, सचिव अजित पाटील, देविदास हडपे, पिंटू पवार, फैजपूर माजी नगरसेवक केतन किरंगे, देवेन्द्र बेंडाळे, आबीद सर, यावल काँग्रेस शहराध्यक्ष कदिरखान, फैजपूर रियाज मेंबर, रसूल मेंबर, महेबूब पिंजारी, किशोर बोरोले, डी डी वाणी, विनायक महाजन, दिपक धांडे, स्वप्नील धांडे, अनिल लढे, चतुर राणे, विवेक ठाकरे, भुपेश जाधव, अनिल कोळी, मुस्तकींम शेख, नितीन भालेराव, यशवंत महाजन, उमाकांत धांडे, देवेंद्र चौधरी, भरत चौधरी, महेंद्र जंगले, संतोष पाटील, अरुणाताई चौधरी, चिनावल ग्रामपंचायत सदस्य हेमांगीताई भंगाळे, लता मोरे, गीताताई चौधरी यांच्यासह समस्त शेतकरी बांधव व इतर मान्यवर उपस्थित होते.