यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अंकलेश्वर बुऱ्हाणपुर राज्य मार्गावरील चुंचाळे गाव फाट्याजवळ आ. लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातुन प्राप्त झालेल्या १ कोटी रुपये निधी खर्चाच्या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावल चोपडा मार्गावरील असलेल्या बुऱ्हाणपुर अंकलेश्वर या गुजरात आणी मध्यप्रदेश या दोन प्रमुख राज्यांना जोडणारा हा राज्य मार्ग असुन , सातत्याने या मार्गावर वाहनाची वर्दळ ही वाढत असल्याने मागील काही दिवसापासुन या मार्गाच्या रस्त्यांचे डांबरीकरणाचे कार्य आ. लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातुन करण्यात येत आहे. याच मार्गावरील चुंचाळे गावाच्या फाटयावरील वाहनांसाठी अडचणीचा ठरणाऱ्या पुलाचे देखील १ कोटी रुपये १ खर्चाच्या निधीतुन नव्याने बांधण्यात येत असुन , या पुलाच्या भुमिपुजनाचे कार्यक्रम आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी उपजिल्हा प्रमुख तुषार (मुन्ना) पाटील,युवासेना तालुका प्रमुख प्रविण (गोटू) सोनवणे, तालुका उपप्रमुख विनायक आप्पा, तालुका उपप्रमुख योगेश भाऊ पाटिल, दोनगाव चे सूर्यभान पाटिल, शिवसेनेचे यावल शहर प्रमुख शरद कोळी, कोळन्हावी सरपंच विकास (गोटू)सोनवणे, पिंप्री सरपंच मोहन कोळी, दहिगाव चे शिवसेना शाखाध्यक्ष प्रकाश कोळी,भालाशिव चे गजनान, जगदीश सोळंके, कोरपावलीचे भरत चौधरी, चिंचोली चे दिनेश सोळंके, चुंचाळे गावातील शिवसेना शाखाध्यक्ष दिपक कोळी, शाखा उपाध्यक्ष सुधाकर कोळी, आदिवासी सेनेचे अध्यक्ष फिरोज तडवी, इरफान तडवी, बोराळे अध्यक्ष भरत राजपूत, प्रदीप वानखेडे, विकी वानखेडे, अजित तडवी, मजित तडवी, शेखर तडवी व इतर शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.